औशात शांतता कमिटीची बैठक संपन्न..
औसा -मुखतार मणियार
29 जून 2023 गुरूवार रोजी बकरीद ईद आणि आषाढी एकादशीचा सण असुन हा उत्सव सर्व धर्मीय बांधवांनी सामाजिक सौहार्द पूर्ण आणि शांततामय वातावरणात साजरा करावा असे आवाहन लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी औसा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी आर जे इंगवले, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, बाळासाहेब डोंगरे,आणि लिंगे यांची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना पोलिस अधीक्षक म्हणाले की, गुन्हेगारीला वाढत्या आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.तरीपण नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा हातात घेण्याचे कृत्य करु नये , अवैध धंद्याला पोलिस प्रशासन कोणत्याही परिस्थितीत पाठिशी घालणार नाही.सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणार
नाहीत याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून सोशल मिडिया वरुन धार्मिक भावना दुखावण्याचे काम अल्पवयीन मुला मार्फत होत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपला स्मार्टफोन अल्पवयीन मुलाकडे देऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.अल्पवयीन मुलाकडे स्मार्टफोन दिल्यास त्यांच्या वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.नागरिकांनी आपल्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास पोलिस प्रशासनास कळवाव्यात .औसा तालुक्यामधील पोलिस प्रशासन तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्यास थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात संपर्क साधावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.शांततेचा वारसा लाभलेल्या लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुचित प्रकार किंवा घटना घडणार नाहीत यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून आपण सर्वतोपरी खबरदारीचे घेण्याचा प्रयत्न करू अशी शाश्वती त्यांनी बोलताना दिली.बकरीद ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 19 जून रोजी औसा शहरात पोलिसांनी पथसंचलन करुन पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले.शांतता कमिटीच्या बैठकीसाठी विविध व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते.


0 Comments