सौ शोभाताई अभिमन्यू पवार यांच्यासह अनेक महिलांचा योग दिनामध्ये सहभाग
औसा योग गुरु रामदेव बाबा यांच्या संकल्पनेतून आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होत आहे योग दिनाचे औचित्य साधून औसा येथील श्री मुक्तेश्वर विद्यालयाच्या सभागृहामध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी सौ शोभाताई अभिमन्यू पवार यांच्यासह योग शिक्षिका आणि अनिता पाटील, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पनाताई डांगे, माजी नगरपरिषद सदस्य प्रमिला कांबळे, यांच्यासह औसा शहरातील शेकडो महिला व विद्यार्थिनी योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होत्या योग दिनानिमित्त मार्गदर्शन करीत असताना अनिता पाटील यांनी म्हटले की आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये योगा करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगाला अत्यंत महत्त्व द्यावे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

0 Comments