लातूर शहरातील चार्ली पोलीस पेट्रोलिंग आता अधिक सशक्त. चार्ली पोलीस पेट्रोलिंग मोटार सायकलच्या संख्येमध्ये वाढ. चार्ली मोटरसायकलवर सायरन,अलाउंसिंग सिस्टीमसह ब्लिंकर्स लाईट.*



*लातूर शहरातील चार्ली पोलीस पेट्रोलिंग आता अधिक सशक्त. चार्ली पोलीस पेट्रोलिंग मोटार सायकलच्या संख्येमध्ये वाढ. चार्ली मोटरसायकलवर सायरन,अलाउंसिंग सिस्टीमसह ब्लिंकर्स लाईट.*


     








       चार्ली मोटरसायकल पेट्रोलिंग अधिक प्रभावी करण्यासाठी मोटरसायकल मध्ये लावण्यात आलेले सायरन ,अलाउंसिंग ,सिस्टीम ब्लिंकर्स लाईट व वॉकीटॉकी कम्युनिकेशनसह असलेले मोटारसायकल अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी हरी झेंडी दाखवून केले रवाना.उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री.भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा गणेश कदम, मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक काळे यांची उपस्थिती.


            याबाबत थोडक्यात माहिती अशी की, काही महिन्यापूर्वी लातूर शहरात चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंग कार्यान्वित करण्यात आली होती. दरम्यान काळात चार्ली मोटरसायकल पेट्रोलिंगने केलेली कामगिरी व त्याचे फायदे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी शहरातील चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंगच्या संख्येमध्ये वाढ करून सहा वरून बारा इतकी करण्यात आली आहे.

         चार्ली पोलीस पेट्रोलिंग शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 24 तास कार्यान्वित असणार आहे. त्या मोटरसायकलवर आळीपाळीने ड्युटी करिता एकूण 24 पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 

                 चार्ली पोलीस पेट्रोलिंग अधिक प्रभावी व्हावी याकरिता चार्ली मोटरसायकलवर पेट्रोलिंगवर नेमण्यात आलेले पोलीस अंमलदाराना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून चार्ली मोटारसायकलवर सायरन, अलाउंसिंग सिस्टीम, तसेच रात्रीच्या वेळी चार्ली मोटरसायकल लवकर ओळखू यावी याकरिता लाल व निळ्या रंगाची ब्लिंकर्स लाईट  लावण्यात आलेले आहेत. यामुळे चार्ली पोलीस पेट्रोलिंग मोटरसायकलला एखाद्या ठिकाणी लवकरात-लवकर पोहोचता येऊन अलाउंसिंग सिस्टम वरून सूचना देता येणार आहेत. तसेच सदरच्या चार्ली पेट्रोलिंग वरील पोलीस अमलदार यांच्याकडे स्वयंचलित शस्त्र व वायरलेस वाकीटॉकी राहणार असून त्याद्वारे चार्ली पेट्रोलिंग ड्युटीवरील पोलीस आपसात कम्युनिकेशन करू शकणार आहेत.

                     सदर चार्ली पेट्रोलिंगद्वारे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना, महिलांना,लहान बालकांना व  वयोवृद्धांना त्वरित मदत मिळणार असून ट्राफिक जाम, भांडण तक्रारी व काही अनुचित घटना घडत असताना डायल 112 वर कळविल्यावर लगेचच चार्ली पोलीस पेट्रोलिंगची मोटरसायकल सदर ठिकाणी पोहोचणार आहे. अडचणीत सापडलेल्या लोकांनी डायल 112 वर कॉल करून मदत मागितल्यास चार्ली पोलीस पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदार तात्काळ सदर ठिकाणी पोहोचणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांना पोलीस मदत पाहिजे असल्यास त्यांनी त्यांचे मोबाईल मध्ये 112 असे टाईप करून कॉल केल्यास त्यांना तात्काळ चार्ली पोलीस पेट्रोलिंग कडून मदत पुरविण्यात येणार आहे.

              तसेच कोणी जर खोडसाळ पद्धतीने किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने डायल 112 चा गैरवापर केल्यास त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक वेळीच पोलीस मदत मिळविण्याकरिता डायल 112 चा वापर करावा.

Post a Comment

0 Comments