पतंजली योग समिती औसाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा....
औसा मुखतार मणियार
योग गुरू रामदेव बाबा यांच्या संकल्पनेतून आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होत आहे.या योगदिनाचे औचित्य साधून औसा येथील आझाद महाविद्यालयात पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष नेताजी सावंत सर,व कोषाध्यक्ष गोंवीद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली योगदिन साजरा करण्यात आला.यावेळी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य मासुमदार, प्राध्यापक मगबुल बरोटे, प्राध्यापक कोतवाल, प्राध्यापक एस बी शेख, प्राध्यापक जावळे, प्राध्यापक बाडगिरे, प्राध्यापक शिंदे, प्राध्यापक गोरे, प्राध्यापक पटेल, प्राध्यापक पाटील, प्राध्यापक गोरे, वाघमारे,साजन सर यांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला.व तसेच औसा येथील श्री चक्रधर विद्यालय येथेही योगदिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्रीमती अनुपमाजी भंडारी, माध्यमिक मुख्याध्यापक मोईज सर,अजहर सर,आंदुरे सर,इंजे सर, मुल्ला सर,जंगमे मॅडम क्षिरसागर मॅडम,कोरे मॅडम यांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला.व तसेच औसा येथील मुक्तेश्वर विद्यालयाच्या सभागृहात आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी सौ.शोभाताई अभिमन्यू पवार यांच्यासह योग शिक्षिका आणि अनिता पाटील, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पनाताई डांगे,माजी नगराध्यक्ष सदस्या प्रमिला कांबळे,याच्यासह औसा शहरातील शेकडो महिला व विद्यार्थिनी योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.योगदिनानिमित्त मार्गदर्शन करीत असताना अनिता पाटील यांनी म्हटले की आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये योगा करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगाला अत्यंत महत्व द्यावे असेही यावेळी स्पष्ट केले.
तसेच श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औसा येथे योगशिक्षक श्री रेड्डी सर व पावले सर यांच्या मार्गदर्शनाखाली योगा स्पर्धेत विभागातून प्रथम आलेल्या इयत्ता आठवीचा विद्यार्थी अनुराग सावंत यांनी चित्त थरारक योगासने करून सर्वांचे मने जिंकले.तसेच उपस्थित विद्यार्थ्याकडून योगासने करून घेण्यात आले.

















0 Comments