आर टी ई रकमेची परिपूर्ती तातडीने करा गरीब मुलांना शाळा शिकू द्या आम आदमी पार्टीचे निवेदन

 आर टी ई रकमेची परिपूर्ती तातडीने करा गरीब मुलांना शाळा शिकू द्या आम आदमी पार्टीचे निवेदन





लातूर मुख्तार मणियार 

आम् आदमी पार्टी वगळता देशातील इतर कोणत्याही पार्टीच्या सरकारने शिक्षणाला महत्व दिलेले नाही. चांगल्या दर्जाचे शिक्षण दिल्यास देशाची प्रगती आपोआप होईल असा आम् आदमी पक्षाचा ठाम विश्वास आहे. या करीता आपच्यां दिल्ली सरकारने आपल्या वार्षिक बजेटमध्ये 21% सुमारे 16800 करोड रुपये तर पंजाब आप सरकारने आपल्या बजेटच्या सुमारे 8.33% सुमारे 17072 करोड रुपये हे शिक्षणासाठी तरतूद केले आहेत.


महाराष्ट्र सरकारने मात्र मागील चार वर्षापासून आरटीई शिक्षण देणाऱ्या अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे असे असे सांगत आज आम आदमी पार्टीने जिल्हा शिक्षणाधिकारी यांना थकित रक्कम लवकर देण्यासाठी निवेदन दिले.


'एकीकडे राजकीय नेते मंडळीच्या मुलांचे शिक्षण पंचतारांकित शाळात , परदेशात चालू आहे. परंतु सरकार गरीब , वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी मात्र निधी नाही असे सांगत हात वर करीत आहे' अशी टिका आपचे माजी जिल्हा सचिव इंजिनियर .आश्विन नलबले यांनी केली.


महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांची एक लाख मुले दरवर्षी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतात. आता २२-२३ शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून शासनाकडून *गेल्या चार वर्षातील सुमारे अठराशे कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने शाळांना न दिल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अडचणीत आल्या आहेत. दरवर्षी शासन दिरंगाई करीत असल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते आहे. यंदा पुन्हा तशीच वेळ आली आहे असा आरोप यावेळेस नलबले यांनी केला.


फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेत राज्य करणाऱ्या शासनाच्या दरबारी मुलांना मात्र न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. संविधानाने दिलेल्या शिक्षण हक्काची पायमल्ली होते आहे असे प्रतिपादन आप चे नेते दीपक कानेकर यांनी केले.


शासनाने या शाळांची थकीत शैक्षणिक शुल्क रक्कम आठ दिवसात अदा करावी व लाखो मुलांचे शिक्षण चालू ठेवावे अशी आम आदमी पार्टी मागणी करीत आहे. अन्यथा आम आदमी पार्टी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा या वेळेस देण्यात आला. आज च्या  निदर्शनात आप नेते दीपक कानेकर, सुमित दीक्षित, फिरोज शेख,शिवलिंग गुज्जर, विश्वंभर कांबळे, सैयद मुस्तफा, शाहरुख शेख, हरी गोटेकर, विवेक वाघमारे आदी सामील झाले होते.


Post a Comment

0 Comments