आणखीन एका विनयभंगाच्या गुन्ह्यांत 24 तासाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौक ची कारवाई.*



               *आणखीन एका विनयभंगाच्या गुन्ह्यांत 24 तासाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौक ची कारवाई.*    




लातूर 

               महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी व अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कडक धोरण अवलंबून विनयभंगाच्या व इतर महिलाविषयक गुन्ह्यात तात्काळ तपास करून आरोपीवर लवकरात-लवकर न्यायालयात आरोपपत्र दाखल दाखल करणे बाबत लातूर जिल्ह्यातील प्रत्येक ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्याचीच प्रचिती म्हणून लातूर जिल्ह्यात दाखल होणारे महिला विषयक गुन्हे अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्यात येत आहेत.
                  दिनांक 11/07/2023 रोजी गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्ह्यातील आरोपीने 42 वर्षीय फिर्यादी महिलेला पाहून अश्लील चाळे करून, अंगाला हात लावून, फिर्यादीचे घराकडे वारंवार चकरा मारून विनयभंग केला म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 354, 354(अ), 354 (ड), 500  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी दिलेल्या सूचना व आदेशाप्रमाणे पोलीस अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी,(लातूर शहर) श्री.भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे व त्यांच्या टीमने सदर गुन्ह्यांचा 24 तासाच्याआत तपास करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले आहे.
              आरोपींना तातडीने शिक्षा होण्याबरोबरच, गुन्हेसिद्धीचे प्रमाणही वाढावे, यामागचा उद्देश असून महिला अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी कायदे कठोर करण्यात आले आहे.     
                विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर तक्रारींची दखल घेऊन त्यावर तातडीने आरोप निश्चित करून कोर्टात उभे केल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे शक्य होते. यामुळे महिलांच्या मनात विश्वास निर्माण होईल व गुन्हेगारांनाही चाप बसेल.
               महिला अत्याचार करणाऱ्यांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या विरुद्ध तातडीने आणि जलद गतीने तपास करून मा. न्यायालयांमध्ये सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल करून कडक प्रतिबंधक कारवाई अशा इसमाविरुद्ध करण्यात येत आहे. महिला अत्याचाराशी संबंधित प्रकरण व गुन्ह्यांमध्ये अत्यंत संवेदनशीलपणे व तात्काळ कार्यवाही करण्यात येत असल्याने महिलावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारावर जरब बसणार आहे.
                   सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे, पोलीस अमलदार दयानंद अरदवाड, विष्णू पंडगे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments