कुमारी किरण सगरे यांचे इंजीनियरिंग परीक्षेत उज्वल यश
औसा प्रतिनिधी :-औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरेयांची कन्या किरण काशिनाथ सगरे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून घेण्यात आलेल्या सिव्हिल इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन उज्वल यश संपादन केले आहे किरण सगरे यांच्या यशाबद्दल ज्येष्ठ पत्रकार रमेश दूरुगकर, राजू पाटील, विजयकुमार बोरफळे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे, सचिव महबूब बक्षी, विनायक मोरे, रमेश शिंदे, रोहित हंचाटे, श्याम कुलकर्णी, राम कांबळे एस ए काझी, इलियास चौधरी, पटेल किशोर जाधव, वामन अंकुश, सामाजिक कार्यकर्ते आत्माराम मिरकले, संभाजी शिंदे, प्रा नजीर शेख कापड व्यापारी असोसिएशनचे मुजाहिद पटेल राम मसलगे, बालाजी शिंदे, दयानंद माळी, संतोष गडेकर इत्यादींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments