*माणुसकी धर्म पाळणारे स्वच्छता निरीक्षक महेमूद शेख*
–----------------
औसा नगर परिषदचे स्वच्छता निरीक्षक महेमुद वजीरसाब शेख यांचा जन्म दिनांक 9 जुलै 1974 रोजी शिंदाळा(लो) ता. औसा जि. लातूर या लहानश्या खेडेगावात झाला .घरात कसलेही शैक्षणिक वातावरण नव्हते
कोणीही शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित नसून घरची परिस्थितीअतिशय बिकट असल्यामुळे शिक्षण शिकुन मोठे अधिकारी ,कर्मचारी, शिक्षक,बनावे अशी अपेक्षा उराशि बाळगुन गावातच 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले, महेमुद शेख लहान पनापासुनच शिक्षणात हुशार, मेहनत, कष्ट करणारे, चतुर, शांत मीतभाषी स्वभाचे आहेत त्यानी जीवनामध्ये कधिच हार मानली नाही किंवा हताश होऊन खचून गेले नाहीत. ई 10 वी पास होताच त्यांना औसा नगर परिषद मध्ये
दिनांक 20.10.1992 रोजी न प मध्ये रोजंदारीवर तत्कालीन नगराध्यक्ष अँड स्वर्गवासी मा. मुजीबोद्दीन पटेल यांनी नोकरीत घेतले नोकरीवर घेतले असता त्यांनी महेमुद शेख यांच्या साधा चहाची ही अपेक्षा देखील केली नाही हे स्व पटेल साहेब यांचे मनाचा मोठे पणाच म्हणावे लागेल
नोकरी लावण्या मध्ये कै.सालार जाफरसाब पटेल कै. रमेश दुबे माजी नगरसेवक यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. त्यानंतर महेमुद शेख हे
दिनांक 3.5.2001 रोजी मजूर पदावर सेवेत कायम झाले. महेमुद शेख यांना औसा न.प. प्रशासानने विविध विभागाची जबाबदारी सोपवली यामध्ये बांधकाम परवानगी विभाग, नाव नोंदणी/नामांतर विभाग, लाईट विभाग, वसुली विभाग, जकात नाका विभाग, पाणी पुरवठा विभाग असे विविध विभागाची जवाबदारी दिली ती जबाबदारीने व इमानदारीने एकनिष्ठेने पार पाडली आहे. त्यांचे दिनांक 16/10/2018 रोजी पदोन्नती होऊन महेमुद शेख हे सध्या स्वच्छता निरीक्षक या पदावर औसा न प मध्ये कार्यरत असून त्यांचा दिनाँक 16/3/2021 रोजी महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्गामध्ये राज्य शासनातर्फे समावेश करण्यात आले. महेमुद शेख यांनी नोकरीमध्ये कामालाच अधिक महत्व देवून काम केल आहे आजपण शहरातील दैनंदिन स्वछतेची कामे ते नीट नेटके पणाने करून घेतात स्वच्छतेचे बाबतची कोणतीही समस्या असो ते त्याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढतात. आगोदर काम नंतर बाकी सर्व हे धोरण आज ही आहे.पावसाळा असो किंवा हिवाळा असो किवा उन्हाळा असो दररोज पहाटे 4.30 वाजल्यापासून शहरात फिरून दैनंदिन स्वच्छतेचे कामे करून घेतली जाते पावसाचे पाणी जर कोणाच्या घरात शिरले तर अर्ध्यारात्री फोन केलातरी त्यावेळेस कामगाराना घेवून हजर राहुन काम पूर्ण करतात.
स्वच्छ सर्वेक्षण 2018 -2019 मध्ये महेमुद शेख, स्वच्छता निरीक्षक यांनी व सफाई कामगार यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे औसा नगर परिषद संपूर्ण देशात 8 वा महाराष्ट्र. 6 वा. मराठवाड्यात 1 ला क्रमांक स्वच्छ सर्वेक्षणात मिळविला होता. औसा नगर परिषदेला महाराष्ट्र व केंद्र सरकार यांच्या मार्फत 10 कोटीचे बक्षीस देखील महेमुद शेख हे स्वच्छता निरीक्षक असताना मिळाले असून त्याचे सर्व श्रेय डॉ.अफसर शेख ,माजी नगराध्यक्ष तत्कालीन मुख्याधिकारी मा.श्रीमती वसुधा फड,स्वच्छता निरीक्षक महेमुद शेख व सर्व सफाई कामगार यांचेच आहे.
*_कोरोना काळात देखील स्वच्छता विभाग आणि महेमुद शेख यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे._*
संपूर्ण जगात कोरोना सारख्या महामारीने हाहाकार माजवला होता एकीकडे अनेक जन आपले नातेवाईक यांना कोरोना रोगापासून वाचविल्याकरिता आपल्या जीवाचे रान करत होते डॉक्टर अधिकारी, शासकिय यंत्रणा सरकार सदर रोग जास्त पसरू नये म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करत होते. याला नागरिक पण सहकार्य करत होते. जे कोरोनावर मात करत जगले ते जिंकले ते कोरोना युध्द म्हणून ओळखले गेले, तर दुसरी कडे जे लोक या कोरोनामुळे मयत झाले त्यांचे नातेवाईक अंतिम संस्कार व दफनविधी करू शकत नव्हते. त्यावेळेस औसा नगर परिषदेचे स्वच्छता निरिक्षक महेमुद शेख, यानी माणुसकीचा धर्म व आपले कर्तव्य म्हणून आपल्या कर्तव्याची एकनिष्क व प्रमाणिक राहून आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना मुळे मृत्यु झालेल्या रुग्नजवळ कोणतेही नातेवाईक जवळ जात नव्हते अशा वेळेला फक्त आणि फक्त माणुसकीचा धर्म पाळावा म्हणून स्वच्छता निरीक्षक महेमुद शेख यांनी कोरोना काळाच्या एका महिन्यात तब्बल 48 विविध जाती-धर्मातील लोकांचे त्या त्या धर्माच्या विधी प्रमाणे दफन विधी व अतिमसंस्कार हे योग्य प्रकारे त्या मयताची कोणत्याही प्रकारची अहवेलना न होऊ देता आपल्या जीवाची पर्वा न करता माणुसकी धर्म पाळत पार पाडले असून या कोरोना काळात केलेल्या कामावर खुश होवून काँग्रेस पक्षाचे युवकचे जिल्हा उपाध्यक्ष.श्री. हणमंतप्पा राचट्टे यांनी नगदी रोख रक्कम देवून त्यांचा व सर्व कर्मचारी यांचा सन्मान केला आणि औसा शहरातील विविध सामाजिक संघटना व मित्रमंडळ, युवा मंच ,व मान्यवर अधिकारी यांच्याकडून कोरोना काळात चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे सत्कार करण्यात आला आहे. तसेच शहर गणेश विर्सजन, शिवजयंती, आंबेडकर जयंती, किंवा विविध जयंती असो हे सर्व स्वच्छतेची स्वता उभे राहून कामे करतात आश्या या माणुसकी धर्म पाळणा-या स्वच्छता निरीक्षक महेमुद शेख यांचा आज वाढदिवस अशा निस्वार्थी माणसाचा प्रत्येक दिवस वाढत जावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना व महेमुद शेख यांना वाढदिवसा निमित्त निरोगी व उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...























0 Comments