चिंचा फोडुन कष्टाने जमवलेल्या 1600 रुपयांची ओमराजेंना मदत

महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो उस्मानाबाद धाराशिव-




लोक कल्याणासाठी अहोरात्र झटणारा नेत्याला लोक डोक्यावर घेऊन नाचतात लोकांना  गृहीत धरणाऱ्याला धडा शिकवतात यांचीच     प्रचिती उस्मानाबाद धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओम राजे निंबाळकरांबाबतीत आली. 
         ओमराजे निंबाळकरांना जनतेचा   वाढता पाठिंबा पाहता ग्रामिण भागातील अनेक शेतकरी मजूर बांधवांकडून निंबाळकर     यांना   आर्थिक मदत केली जात आहे हा मदतीचा  ओघ   सुरू असुन परवा तुळजापूर   तालुक्यातील   मंगरुळ गावच्या ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे या      भगिनीने फोडुन स्वकष्टांने सोळाशे रूपये जमवुन लोक कल्याणासाठी.    प्रामाणिकपणे  खोक्याला लाथ मारून पक्षाशी एकनिष्ठ राहिले जनतेशी विश्वास घात न करता लोकांच्या  कल्याणासाठी झटणारे सजग असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना निव डणुकी मध्ये आर्थिक मदत म्हणुन रात्रंदिवस कष्ट करून चिंचा फोडलेले १६०० रूपये निंबाळकर यांना सुपुर्द केले.
      याबाबत बोलताना निंबाळकर म्हणाले की बहीणीने केलेली मदतीसमोर करोडो रूपये झिरो आहेत यांचे ऋण न फिटणारे आहे माझ्या वर हा दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments