सोलापूरमध्ये आय टी पार्क उभारणारच- आ. प्रणिती शिंदे

सोलापूरमध्ये आय टी पार्क उभारणारच-  आ. प्रणिती शिंदे








महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो : सोलापूर 
सोलापूरमध्ये इंडिया आघाडीच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सेनाप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपस्थित विराट सभेला  आ.प्रणिती शिंदे यांनी संबोधित केले यावेळी ते बोलत होते. 
         सोलापूर मध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना त्या असे म्हणाल्या की मागील दहा वर्षांपासून दोन भाजपचे खासदार सोलापुरच्या जनतेने निवडून दिले मात्र त्यांनी पुन्हा पाच वर्ष परत तोंड दाखवले नाही शहराची , जिल्ह्याची पुरती वाट लावली त्यामुळे या भाजपला धडा शिकविण्यासाठी आपण सोलापूर उजनी धरणातून पाणीपुरवठ्यासाठी डबल पाइपलाइन टाकण्याचे काम करणार ,सोलापुर शहर खड्डेमुक्त करणार ,‌ पुणे मुंबईला  रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांसाठी कायम स्वरूपी पर्याय म्हणून सोलापूरमध्ये आय टी पार्कचे भुमीपुजन केले असून त्याची उभारणी करणार, विडी उद्योग कामगारांचे आर्थिक सामाजिक सबलीकरण करणार , सोलापुर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणारच असल्याची प्रतिज्ञा आ.प्रणिती शिंदे यांनी केली.
यावेळी विराट जनसभेने उत्स्फूर्तपणे दाद दिली.

Post a Comment

0 Comments