रमाई घरकुलाचे व प्रधानमंत्री आवास यौजनेचे अनुदान देतेवेळी टॅक्स भरणा अट रद्द करून (*वाढीव निधी 5 लाख रुपये* *अनुदान देण्यात यावे.* ) *लोक प्रहार संघटनेची मागणी

*रमाई घरकुलाचे व प्रधानमंत्री आवास यौजनेचे अनुदान देतेवेळी टॅक्स भरणा अट रद्द करून 
(*वाढीव निधी 5 लाख रुपये* *अनुदान देण्यात यावे.* )     
                                       *लोक प्रहार संघटनेची मागणी


लातूर प्रतिनिधी "- लक्ष्मण कांबळे

रमाई घरकुलाचे व प्रधानमंत्री आवास योजनेचे
अनुदान त्वरित लाभार्थी यांना देंन्यात यावे.                                                   
लातुर शहर मनपा तर्फे रमाई घरकुलाचे अनुदान टॅक्स भरणा केल्यानंतरच हफ्ता दिला जाईल अशी लावलेली अट रद्द (शिथिल) करून लाभार्थी यांना त्वरीत हफ्ते देण्यात येऊन, *वाढीव निधी 5 लाख रुपये* करण्यात यावा. अशा मागणीचे निवेदन लोक प्रहार संघटनेतर्फे मनपा आयुक्त यांना देण्यात आले आहे. व महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, संमाजकल्याण मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी लातूर, संमाजकल्याण आयुक्त लातूर यांना निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत रमाई घरकुल आवास योजना व प्रधानमंत्री आवास यौजना राबविण्यात येते. गरिबाना आपले हक्काचे पक्के घर बनविण्यासाठी शासनामार्फत अडीज लाख रुपये इतका निधी दिला जातो.
परंतु या निधी मध्ये आज घर बांधणे अवघड झाले आहे. वाढती महागाई, वाढलेले सळई, सिमेंट, मजुरी, वाळू, खडी,कच व वाहतूक खर्च यामुळे गरिबाना इतक्या तुटपुंज्या निधित घर बांधणे अवघड होत आहे.
त्यामुळे वाढीव निधी 5 लाख रुपये इतका देण्यात यावा. अशी जनहिताची मागणी लोक प्रहार संघटनेतर्फ करण्यात आली आहे.
               अगोदरच लाभार्थी आर्थिक परेशानीत आहेत आणि अशातच लातूर मनपा आयुक्त /उपायुक्त यांनी सध्या नवीन अट लावलेली आहे की,अगोदर पाणीपट्टी कर, मालमत्ता कर भरल्यानंतरच लाभार्थी यांचे हफ्ते दिले जाणार अशी अट लावलेली दिसत आहे.
अगोदरच्या प्रशासकीय काळातील कोणत्याही आयुक्त /उपायुक्त यांनी अशी अट लावलेली नव्हती असे लोक प्रहार संघटनेचे म्हणणे असून अगोदर लातूर शहरातील नागरी वस्त्याना सोई - सुविद्या द्या, स्वच्छ दोन दिवसाला पाणी पुरवठा करा. व पाणी प्रेशरणे येईल यांची उपाय योजना करून कचऱ्याचा प्रश्न, स्वछतेचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न सोडवावा. या सर्व वरील प्रश्नावर लोक प्रहार संघटनेच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अश्या मागणीचे लोक प्रहार संघटने मार्फत मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे . निवेदनावर लोक प्रहार संघटनेचे, संस्थापक अध्यक्ष अजय सूर्यवंशी
रोहित सोनवणे युवा जिल्हाद्यक्ष,जयपाल लोखंडे, लाला सोनवणे, निखिल कोलते, दगडू गायकवाड, युवराज गुंजुटे, राहुल आखाडे,रवी मस्के, सचिन इचके, बालाजी जाधव, अवि कदम, अभि रसाळ,दत्ता ढवळे, गणेश जाधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments