जुन्या औसा शहरातील ज्या भागात पाईप लाईन नाही, किंवा नळाला पाणी येत नाही, अथवा योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही त्याभागातिल नागरिकांनी नगर पालिकेत आपल्या तक्रारी नोंदवाव्यात.
उमर भाई पंजेशा
२) मोमीन गल्ली येथील अलीम करपुडे यांच्या घरा पासून वाजीद चौधरी यांच्या घरा पर्यंत दहा बारा वर्षांपासून नळाला पाणी येत नसून नवीन पाइप लाईन टाकून पाणी पुरवठा सुरळीत करावे.
३) सतिष नाईक ते संतोष वर्मा यांच्या घरा पर्यंत नळाला पाणी येत नसून नवीन पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा सुरळीत करावे .
४) सुरतशाह शाळेपासून मोमीन गल्ली पर्यंत नालितून टाकण्यात आलेली तात्पुरती हस्ती पाईप लाईन काढून नविन जमिनीत पुरून पाणीपुरवठा योग्य दाबाने सुरू करावे.
५) जुन्या औसा शहरातील ज्या भागात नळाला पाणी येत नाही अथवा योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही अश्या सर्व भागाचे सर्वे करुन ४३ कोटीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत या सर्व भागात नवीन पाईप लाईन टाकून त्याभागातील प्रत्येक घराला पाणीपुरवठा करून द्यावा.
अश्या वरील विविध मागण्यांचे निवेदन मा.मुख्याधिकारी औसा यांना निवेदन देण्यात आले,
त्यावेळी इस्माईल (हाजी)शेख, जहीर शेख, बागवान बिरादरी, व औसा शहरातील नागरिक उपस्थित होते.
जुन्या औसा शहरातील ज्या भागात पाईप लाईन नाही, किंवा नळाला पाणी येत नाही, अथवा योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही त्याभागातिल नागरिकांनी नगर पालिकेत आपल्या तक्रारी नोंदवाव्यात.
उमर भाई पंजेशा
शहराध्यक्ष अ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औसा यांनी असे आव्हान केले आहे
0 Comments