सोलापुरात अल्पसंख्यांक शिक्षण परिषद व एशिअन मायनॉरिटी युनिव्हर्सिटीचा पायाभरणी सोहळा तीन नोव्हेंबरला*

 *सोलापुरात अल्पसंख्यांक शिक्षण परिषद व एशिअन मायनॉरिटी युनिव्हर्सिटीचा पायाभरणी सोहळा तीन नोव्हेंबरला*






सोलापूर-  ग्लोबल एज्युकेशनल अँड हेल्थ ऑर्गनायझेशनच्यावतीने सोलापूर शहराजवळ दक्षिण सोलापूर तालुक्यात वळसंगजवळ मायनॉरिटी युनिव्हर्सिटीची उभारणी करण्यात येणार आहे. या विद्यापीठाचा पायाभरणी सोहळा तीन नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने अल्पसंख्यांक समाजातील शैक्षणिक समस्यांचा उहापोह करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण समन्वय परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती या विद्यापीठाचे मुख्य प्रवर्तक आसिफ इकबाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मागील अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांक समाजातील शिक्षणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. बालमजूर, शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत चालली आहे. सुविधा नसल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. या सर्व समस्यांना पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांकांच्या शैक्षणिक विकासाचे उद्देश नजरेसमोर ठेऊन एशियन मायनॉरिटी विद्यापीठाची स्थापना करण्यात येत आहे. या विद्यापीठाची दिशा व त्याची गरज स्पष्ट करण्यासाठी सोलापूर शहरात तीन नोव्हेंबरला दिवसभर ‘अल्पसंख्यांक शैक्षणिक समन्वय परिषद’ घेण्यात येत आहे. या परिषदेसाठी उद्‌घाटक म्हणून यावेळी  डॉ. जहीर काझी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उमरैन महफूज रहमानी, माझी कुलपती जफर सरेश वाला, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु एस. एन. पठाण, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु एन. एन. मालदार, अजमेर दर्गाह ट्रस्टचे चेअरमन सय्यद सरवर चिश्ती, समीर सिद्दीकी, मुबारक कापडी, डॉ. ऐनुल हसन, डॉ. अफसर आलम, मुहम्मद अतिक अहमद, डॉ. अब्दुल कदीर, हसन चौगले, अमीर अली खान, प्रो डॉ. गज़नफ़र अली, अली एम शम्सी, शाह आलम रसूल, एस. एन पठान , मुश्ताक अंतुले, इक्बाल मेमन, मुहम्मद अली पाटनकर, मेहबूब कासार, डॉ. शहीद खोत, आमिर इद्रिसि, इक्बाल शेख, अमीर अंसारी, डॉ. अंजुम कादरी, मुफ़्ती ज़ैनुलआबेदीन, खालिद सैफउद्दीन उपस्थित राहणार आहेत. 

विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ सकाळी आठ वाजता वळसंग येथे होईल. त्यानंतर सोलापूरातील हेरिटेज लॉन येथे १० वाजता परिषेदेस सुरुवात होईल. परिषद तीन सत्रात होणार आहे. आधुनिक शिक्षण गरज व आपली जबाबदारी हे पहिले सत्र सकाळी ११ वाजता सुरु होईल. या सत्रात अलीगड विद्यापीठाचे प्रा. सऊद आलम कास्मी, मेहमूद सिद्दीकी, खालीद सैफुद्दीन मार्गदर्शन करणार आहेत.  त्यानंतर दुपारी २.३० वा. मुस्लिम शिक्षण संस्था – समस्या व उपाय या विषयावर परिसंवाद होईल. या सत्रात शाह आलम रसुल,खालीद सैफुद्दीन, हे मार्गदर्शन करतील.

 संध्याकाळी सहा वाजता जनसभा होईल.  मौलाना आझाद विद्यापीठ जोधपूरचे संस्थापक अतिक अहमद हे या जनसभेचे  अध्यक्ष असतील. शिक्षणतज्ज्ञ मुबारक कापडी, समीर सिद्दीकी यांची खुली जनसभा होईल. 

या परिषदेसाठी सोलापूर शहरातील नागरीकांनी आणि शिक्षणक्षेत्रात कार्यरत शिक्षक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन प्रस्तावित  विद्यापीठाचे मुख्य प्रवर्तक आसिफ इक्बाल, फारुक सय्यद, डॉ.कासिम इमाम, सरफराज अहमद, ग्लोबल एज्युकेशनल अन्ड हेल्थ आर्गनाइजेशन, एशियन सेंटर फॉर सोशल स्टडीज व मासिक गुलबुटे मुंबई च्यावतीने करण्यात आले आहे.


महाराष्ट्राचे नंबर १ चे न्युज चॅनल **महाराष्ट्र रिपोर्टर**न्यूज़ नेटवर्क पोर्टल साठी खालील जिल्हा, तालुका, व गाव भागासाठी प्रतिनिधी नेमणे आहेत


चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपुर, वर्धा, अहमदनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगांव, जालना, लातूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नांदेड, नंदुरबार, नाशीक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वाशिम, यवतमाळ, पालघर या जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रतिनिधी, उपजिल्हा प्रतिनिधी, विशेष जिल्हा प्रतिंनिधी, तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी, ग्रामिण प्रतिनिधी नेमणे आहे. 

इच्छुकानी संपर्क करा 

 *महाराष्ट्र रिपोर्टर* 

संपादक 

मज़हरोद्दीन पटेल 

9975640170

8308509920

Post a Comment

0 Comments