श्री महालक्ष्मी निसर्गोपचार सेंटरचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

  श्री महालक्ष्मी निसर्गोपचार सेंटरचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न








धाराशिव जिल्हयात तेर या ठिकाणी श्री महालक्ष्मी निसर्गोपचार सेंटर चा उदघाटन सोहळा काल दि. 23/12/2024 रोजी उत्साहात संपन्न झाला. तेर या भागात एकही निसर्गोपचार फिजोओ थेरपी सेंटर नसल्याने तेथील लोकांची गैरसोय होत होती. तेर जवळच्या 12 वाडया व तेर गावच्या लोकांना या निसर्गोपचार सेंटरचा फायदा होणार आहे हे लक्षात घेऊन हे निसर्गोपचार सेंटर तेर येथे वाकुरे दंत क्लिनिकच्या खालच्या मजल्यात चालू

तेर जवळच्या 12 वाडया व तेर गावच्या लोकांना या निसर्गोपचार सेंटरचा फायदा होणार आहे हे लक्षात घेऊन हे निसर्गोपचार सेंटर तेर येथे वाकुरे दंत क्लिनिकच्या खालच्या मजल्यात चालू

करण्यात आले आहे. या प्रसंगी आयुष आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अमीर मुलाणी सर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवर आयुष भारत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.जे.बी. धावारे,

 डॉ. के. बी. धावारे, डॉ. अक्षय खुणे, डॉ. संदेश लोखंडे,सौरभ भोसले, प्रमोद हेगडे, सुरज धावारे, कदम राठोड, तेर गावाचे उपसरपंच श्रीमंत रमेश फंड, बाबासाहेब नाईकवाडे, बबलु देशमुख, अभिमान माने, डॉ. वाकुरे, साहेबराव सौदागर, गोरोबाकाका पुराण वास्तु संचालक कर्मचारी अविनाश राठोड, किसन काळे, सविता बागडे, भाग्यश्री बिराजदार, दैवशाला भोरे, अमोल सावंत, अभिजीत सावंत आदि मान्यवर तसेच तेरचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments