शिवलीसह औसा तालुक्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान...... तात्काळ पंचनामे करून आर्थिक स्वरूपाच्या मदतीची शेतकऱ्याची मागणी.

 शिवलीसह औसा तालुक्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान...... 

तात्काळ पंचनामे करून आर्थिक स्वरूपाच्या मदतीची शेतकऱ्याची मागणी.




शिवलीसह औसा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये पपईची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.सोयाबीनला भाव नसल्याने व उसाच्या बाबतीत कारखानदाराकडून  फरफट होत असल्याने.या भागातील शेतकरी पपई लागवडीकडे वळला होता.या शेतकऱ्यानी पपईसाठी प्रति एकर साधारण १ लाख रुपयांच्या वर जमिनीची मशागत ते लागवडी पासून पालन पोषणाचा खर्च केला होता.परंतु मे मध्ये झालेली अतिवृष्टी आणि परत काल परवा झालेल्या अतिवृष्टी मुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पपईचे मोठे नुकसान झाले आहे.आज या गावातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन नुकसान झालेल्या पपईची सर्व शेतकऱ्यासह प्रत्यक्ष बांधावर जाऊन कृषी सहाय्यका समवेत पाहणी केली.शासनाने नुकसान पोहचलेल्या पपई लागवड धारक शेतकऱ्यांना हे.किमान १ लाख रु. नुकसान भरपाई तात्काळ द्यावी.अशी मागणी मी पक्षाच्या व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करत आहे.शासनाने या नुकसान भरपाईच्या संदर्भात गांभीर्याने घेऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपाची  मदत करून दिलासा द्यावा ही विनंती. अन्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसीलदाराच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे शेतकरी

         

Post a Comment

0 Comments