हासेगावचा हरित विक्रम! मा. भीमाशंकरअप्पा बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ १ मिनिटांत ४५० झाडांची लागवड

 हासेगावचा हरित विक्रम! मा. भीमाशंकरअप्पा बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ १ मिनिटांत ४५० झाडांची लागवड 🌱





हासेगाव (ता. औसा, जि. लातूर) :

पर्यावरण संवर्धनाचा अद्वितीय इतिहास घडवत, मा. भीमाशंकरअप्पा बावगे आणि सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभूतपूर्व वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. केवळ १ मिनिटांत ४५० झाडांची लागवड करून हासेगावने हरित क्रांतीचा नवा अध्याय लिहिला.


हा भव्य उपक्रम शिवश्री फाउंडेशन, लातूर, सह्याद्री देवराई प्रतिष्ठान , देवराई फाउंडेशन,पुणे,  लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव आणि ज्ञानसागर विद्यालय, हासेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. या यशस्वी मोहिमेत शिवश्री फाऊंडेशन चे अविनाश टेळे, उल्हास डोलारे,  सहयाद्री देवराई चे सुपर्ण जगताप यांचे विशेष योगदान लाभले.


कार्यक्रमास श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. भीमाशंकरअप्पा बावगे, संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे, मा. नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव चे प्राचार्य डॉ. नितीन लोणीकर, तसेच ज्ञानसागर विद्यालय, हासेगाव चे मुख्याध्यापक गोरे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




उपस्थित सर्वांनी एकमुखाने दिला समाजाला हरित संदेश


 🌿 "निसर्ग जपला, तरच भविष्य उज्ज्वल होईल…

आज लावलेले झाड उद्या जीवन वाचवेल!"

🌳 "आजची रोपं म्हणजे उद्याचे प्राणवायू केंद्र,

निसर्गाची सेवा हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा!"



या उपक्रमामुळे हासेगाव परिसरातील जैवविविधतेला नवे बळ मिळणार असून, हा उपक्रम पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Post a Comment

0 Comments