केंद्र राज्य सरकार हे प्रावेड लिमिटेड,बीफ कंपन्यावर कारवाई का नाही--?
तथाकथित गौरक्षकामुळे शेतकरी,व्यापारी,कुरेशी त्रस्त एक दिवसीय धरणे आंदोलन..!
निलंगा(प्रतिनिधी):- निलंगयात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, व्यापारी व कुरेशी समाजाच्या वतीने भव्य दिव्य मुक्क मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या या मुक्क मोरच्यात शेतकरी व व्यापारी यांनी काळ्या पट्टी हाताला बांधून शासनाच्या व गौरक्षकांचा जाहीर निषेध व्यक्त केला. तर एकदिवसीय धरणे आंदोलन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय सोमर करण्यात आले. त्यानंतर रीतसर सर्वांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री, पशुसंवर्धन मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही सर्व शेतकरी, व्यापारी व कुरेशी समाज लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात करणार असल्याचा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे..
संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी,कष्टकरी, शेतमजूर व कुरेशी समाजा तर्फे जनावरे खरेदी विक्री बेमुद्दत बंद पुकारला गेल्याने शेतकरी अक्षरशः हतबल होत असल्याने दिसून येते.
कायद्याने गाई कत्तल करण्यास गुन्हा आहे त्याबद्दल कायदा करण्यात आला आहे. वारंवार फक्त अल्पसंख्याक असल्याने टार्गेट केला जातो की गाई कत्तल केले जातात हे थोतांड आणि खोटं आहे.
कारण इस्लाम धर्मामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की गाई चे कत्तल अजिबात करू नये म्हणून कुरेशी समाज आजपर्यंत गाई चे कत्तल अजिबात करत नाही. विशेषतः आपण भारत देशात राहतो इथं देश संपूर्ण संविधानावावर चालतंय महाराष्ट्रातील कुरेशी समाज हे पारंपरिक व कायदेशीर रित्या पशु व्यापार वाहतूक व कत्तल व्यवसायात आहे.
हल्ली तथाकथित गौरक्षक यांच्या आसरा घेऊन फक्त आणि फक्त जातीय अत्याचार, शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे जनावरे खरेदी विक्री केलेले अधिकृत दाखले असताना सुद्धा बेकायदेशीर गुन्हे नोंद करून गौ शाळेत जनावरे पाठवून तिथून तथाकथित गौरक्षक यांच्या माध्यमातून अनधिकृत पणे धरलेले जनावरे गौरक्षण केंद्रातून जनावरे बाजारात आणून विक्री करण्याचा गौरख धंदा सुरू केले आहेत.
पोलीस प्रशासनाला अनधिकृत असलेल्या जनावरे, कींवा अनधिकृत चालत असलेल्या धंदे यावर कारवाई करणे अपेक्षित असताना अधिकृत दाखले असलेल्या जनावरे धरण्याचा अधिकार सरकार व प्रशासनाने कधी पासून आपला पदभार तथाकथित गौरक्षकाना दिलंय हे एकदा स्पष्टपणे सरकार व प्रशासनाने सांगावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा सौ. मंजुषाताई हिरालाल निंबाळकर यांनी केली आहे.
व्हॅट बँक म्हणून अल्पसंख्याक समाज,व भोळ्या बाभळ्या शेतकऱ्यांना आश्वासने देऊन मत स्वरूपात मतांचा आशीर्वाद घ्यायचं आणि निवडून आल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडायचं.खरं तर हे लोकप्रतिनिधी यांचा काम आहे की आपल्या मतदारसंघात कोण कोणत्या समाजावर घटकावर अन्याय अत्याचार होतोय त्यावर आपण सक्षम भूमिका घेऊन त्यांच्या समस्या व विषय मार्गी लावायचं पण ते करताना दिसत नाहीत हे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक यावर बोलत नाहीत असा आरोप शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला..
तर देशात धनदांडगे यांचे 9 मोठ मोठ्या बीफ कंपन्या आहेत.त्यात एक ही अल्पसंख्याक समाजाचे किंवा बहुजनांचे नाहीत तिथं अक्षरशः गाई चे कत्तल करून बीफ एक्स्पोर्ट करण्यात येते. एकीकडे कुरेशी समाज आणि शेतकरी गाई विक्री खरेदी फक्त दुधासाठी करतोय आणि दुसरे जनावरे शेतकरी ताटून गेलयावर कुरेशी समाजाला विक्री करतो इथं मात्र कोणत्याही जनावरे खरेदी विक्री किंवा कत्तल होऊ नये अशी काही तथाकथित संघटनेची मागणी आहे आणि दुसरीकडे त्यांचेच मालकं बिनदास्तपणे गाई त्याचे वासरू सकट सगळेच जनावरे कत्तल करून बीफ एक्स्पोर्ट करत आहेत दम असेल तर जावा आणि सरकार व गौरक्षकानी ते कंपन्या बंद करून दाखवा.
येऊन जाऊन फक्त टार्गेट शेतकरी आणि अल्पसंख्याक समाजावर खरी हिंमत असेल तर कंपन्या बंद करा दाखवा तुमची हिंमत कारण बाटा ,रेडचीफ,बेल्ट, लिबिस्टीक, घड्याळ चे बेल्ट हे जनावरांच्या चमडीचे असतात मग ते सर्व कारखाने अल्पसंख्याक समाजाचे आहेत का--? जाऊन बघा एक ही तुम्हांला अल्पसंख्याक अथवा मुस्लिम समाजाचा मालक तिथं दिसणार नाही हे नक्कली प्रेम कश्यासाठी--? फक्त मुस्लिम समाजाला जाणूनबुजून टार्गेट करून अन्याय अत्याचार करण्यासाठी काय तर तुम्हांला ज्यांनी आदेश दिले आहेत त्यांना राजकारण करून सत्तेत बसायचं आहे म्हणून हिंदू-मुस्लिम हे भात शिजवणे हे गरजेचे असल्याने हे सगळं गौरक्षकांच्या माध्यमातून खोटं प्रेम दाखवण्याच्या केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघात सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान यांनी केले..
यावेळी वंचित आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मंजुषाताई हिरालाल निंबाळकर,सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान,जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम,राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष इस्माईल लदाफ,कांग्रेस चे हमीद भाई शेख,कांग्रेस युवक शहराध्यक्ष मुजीब सौदागर, डॉक्टर हिरालाल निंबाळकर, गायकवाड तात्या, गणेश मामा जाधव,यांच्या सह कुरेशी जमात चे अध्यक्ष शफीक कुरेशी, उपाध्यक्ष महेबुब कुरेशी, सचिव जहिर कुरेशी, मुसा कुरेशी, बाशा कुरेशी, चांदसाब कुरेशी, नबीसाब कुरेशी, खदीर कुरेशी, शफीक कुरेशी, इस्माईल कुरेशी, इमाम कुरेशी, मेहराज कुरेशी, आदींनी उपस्थिती लावून स्वाक्षऱ्या करत निवेदन सादर केले..
0 Comments