*राजीव गांधी पॉलिटेक्निक मध्ये लोकशाहीचे बिजांकुर*
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक लातूर येथे पारंपारिक पद्धतीने निवडणूक प्रचार यंत्रणा राबवून शांततामय मार्गाने महाविद्यालयीन निवडणूक घेण्यात आली. महाविद्यालयातील प्रमुख विद्यार्थी- विद्यार्थिनी निवडणुकीत देशाच्या राजकारणाची झलक दाखवून दिली. अशा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन जीवनातच बौद्धिक विकास होतो सामाजिक, राजकीय ज्ञान मिळते, अशाच विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना समाजातील प्रत्येक घटकाशी जोडण्याचा राजीव गांधी तंत्रनिकेतनाचा प्रयत्न होता. निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना मौखिक प्राचारा करीता दोन दिवसाचा वेळ दिला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बॅलेट पेपर, निवडणुकीच्या सर्व यंत्रणा व मतदान केंद्र तयार करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत सकाळी दहा वाजेपासून तीन वाजेपर्यंत मतदान झाले व नंतर मतमोजणी करण्यात आली. यावेळी मतमोजणीचे थेट वार्तांकन करण्यात आले.
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया कळण्यासाठी हा उपक्रम राबविला गेला या उपक्रमामुळे मुलांमध्ये नेतृत्व विषयक गुणवत्ता वाढत असून ते लोकशाहीचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ बनण्याची प्रेरणा घेऊ शकतात. लोकशाही प्रक्रियेत नि:पक्षपातीपणाने निवडणूका हे केवळ कागदापूरते मर्यादित न ठेवता प्रत्येक्ष त्या निवडणुकांचा भाग होता आलं पाहिजे या उद्देशाने निवडणूक बॅलेट पेपर वरती घेण्यात आली. या निवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अनिरुद्ध बचाटे तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून आदिबा शेख तर सांस्कृतिक विभाग विद्यार्थी प्रमुख पदी प्रसाद पिनाटे यांची निवड लोकशाही मार्गाने झाली या निवडणुकीत मुख्य निवडणूक आयुक्त प्राचार्य संतोष मेदगे ,निवडणूक निर्णय अधिकारी मुंदडा ए एम , तर केंद्रप्रमुख म्हणून सोनहिवरे एम जी यांनी कामे पाहिली.

0 Comments