उघडा डोळे !बघा नीट !!
राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाची सर्व पिके नष्ट झाली शेतकऱ्यांचे जे काही होते ते होत्याचे नव्हते झाले. राज्य सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शिवारात जाऊन झालेले नुकसान याची देही याची डोळा पाहिली !आता फक्त शेतकरी बांधवांना भरघोस आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. झालेल्या नुकसान एक समान आहे सारखेच आहे आता शेतकऱ्यांना मदतीचा हात देत असताना त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये आवड आणि निवड करू नये सर्व शेतकऱ्यांना एकसमान मदत देण्यात यावे. ऑगस्ट सप्टेंबर विशेष करून या दोन महिन्यातच सर्वत्र मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. मदत देत असताना जुनते जुलै .ऑगस्ट. आणि सप्टेंबर या महिन्यातील पर्जन्यमान वगैरे न पाहता सरसगड सरसकट नुकसान सरसकट मदत मिळालीच पाहिजे .हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनुक्रमे ना. देवेंद्रजी( भाऊ )फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजित( दादा) पवार या तीन मान्यवरांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांना तोंडी दिलास दिला. तर ना. शिंदे ना.अजित(दादा) पवार यांनी शेतीग्रस्तांना तातडीची मदत आणि धान्य वाटप केल्याचे समजते. नुकसान मोठे आहे .संकट मोठे आहे. या कालावधीत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशी मदत देत असताना.मागे राहून कसे चालेल. त्यांनीही तातडीची मदत म्हणून सर्व शेतकऱ्यांना सुरुवातीला प्रति शतकरी दहा हजार रुपये देण्यात यावेत. राज्यातील सरकार तिघांची आहे ती न मान्यवर नी आता मदत करण्याच्या बाबतीत मागे राहून चालणार नाही. आता ती गाणीही हातात हात घालून राज्यातील संकटात सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत लवकरात लवकर देण्यात यावी. .लोक हुशार असतात जाणीव ठेवतात .थोडक्यात लाडक्या बहिणींना काही का असेना मदतीची सुरुवात करण्यात आली. लाडक्या बहिणीने जाणीव ठेवली त्यांनी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने निवडून दिले. लोक लोक दिलेली मदत विसरत नसतात. संकटा संकटत केलेली मदत त्यांना जाणीव करून देते आणि ते योग्य वेळी सहकार्याचा हात पुढे करतात .हे विसरून चालणार नाही. आपण आजपर्यंत पाहिले आहे ऐकण्यात आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संकटग्रस्ताच्या मदतीला नेहमीच धावून जात असतो या अतिवृष्टीच्या काळात संघाचे स्वयंसेवक अद्यापही घराच्या बाहेर पडल्याचे दिसत नाहीत. समाजात आजही संघाकडून लोकांना मदत मिळेल अशी रास्ता पेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संकट मोठे आहे म्हणून मदत ही मोठी जायला हवी .पंजाब सारखे छोटे राज्य शेतकऱ्यांना सरसकट 50000 रुपये आर्थिक नुकसान भरपाई देऊ शकते .हे आपण ऐकलेच असेल तर महाराष्ट्र आणि मुंबई हे तर आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे इथे तर पैशाला काही कमी नाही. असाच पैसा शेवटी शेतकऱ्यांसाठी कर्ज काढावे लागले किंवा इतर मूलभूत विकासाच्या योजना वर्ष सहा महिने पुढे काही काळानंतर त्यांची अंमलबजावणी केली तरी चालेल मात्र शेतकऱ्यांना प्रथम मदतीचा हात द्यायला हवा आम्ही म्हणणार नाही उघडा डोळे बघा नीट कारण आपण सरकार या नात्याने अगदी भव्य दिव्य दृष्टीने राज्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला काय नुकसान झाले ते आपण पाहिलेच आहे शेतकऱ्याकडे रडण्यासाठी अश्रू शिल्लक नाहीत हेही आपण पाहिले मग आता वेळ कशाला वेळ दवडू नका कृपा करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्. शेतकरी आपण केलेली मदत कधी विसरणार नाही. जो संकटात धावून येतो त्याचे स्मरण याचक ठेवत असतो संकटात केलेली मदत. संकट काळात घेतलेली भेट ही मनुष्यमात्रांची सर्वाधिक संस्करणीय देणगी असते. हे विसरून चालणार नाही. मानवताच हा धर्म. हे लक्षात घेता आपण आता कोणत्याही प्रकारचा विलंब न होता चला. उठा .जागे व्हा !!म्हणून पडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा भरभरा द्या ला उ ठा उठा वेळ तोडू नका. या निमित्ताने आम्हाला राज्याचे अभ्यास कुशल अभ्यासू उत्तम संघटक उत्तम प्रशासक.माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासराव जी देशमुख साहेब यांची आठवण येते. प्रशासन प्रशासन कसे हलवावे कसे सक्रिय करावे कसे कळवावे जनतेला असा कसा द्यावा दिलासा कसा द्यावा अशी एक उत्तम उदाहरण उत्तम प्रशासक कुशल संघटक आणि योग्य वेळी योग्य निर्णय क्षमता याला विशेष महत्त्व आहे. म्हणून आपण या कसोटीच्या काळात तात्काळ कार्य तत्पर होऊन तत्पर होऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन मदतीचे वाटप करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि त्यांना समाधानकारक मदत मिळणे हा त्यांचा हक्क आहे.! तुर्त एवढे पुरे !
-विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार
0 Comments