मुदस्सीर काझी यांच्या व्यक्तिविशेष लेख व ऍड. इकबाल शेख यांच्या उत्कृष्ठ निबंधाबद्दल गौरव

 मुदस्सीर काझी यांच्या व्यक्तिविशेष लेख व ऍड. इकबाल शेख यांच्या उत्कृष्ठ निबंधाबद्दल गौरव






औसा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचा 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा अंतर्गत नगर परिषद औसा यांच्या वतीने एप्रिल ते मे महिन्यात जागतिक वसुंधरा अभियान राबविण्यात आले. या अभियानात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती जनजागृती व पाणी बचतीसाठी विविध उपक्रम पार पडले.याच अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत “स्वच्छतेचे महत्त्व” आणि “पृथ्वी वाचवणे ही आज काळाची गरज” या विषयांवर ऍड. इकबाल शेख यांनी लिहिलेला निबंध प्रथम श्रेणीत उत्कृष्ट ठरला. शुक्रवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. मंगेश शिंदे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.याचबरोबर ऍड. इकबाल शेख यांनी लिहिलेला “एक प्रामाणिक आणि मनापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्व – मुदस्सीर काझी” हा व्यक्तिविशेष लेख देखील गौरविण्यात आला. या लेखाची फ्रेम मुख्याधिकारी मा. मंगेश शिंदे व ऍड. इकबाल शेख यांच्या हस्ते मुदस्सीर काझी यांना प्रदान करण्यात आली.या प्रसंगी संपादक जाफर पटेल तसेच बेलेश्वर कल्याणी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments