औशात महायुतीत फूट, महाविकास आघाडी एकजूट ! तिरंगी लढत ठरणार लक्षवेधी, आरोप प्रत्यारोपांना सुरुवात

 औशात महायुतीत फूट, महाविकास आघाडी एकजूट !


तिरंगी लढत ठरणार लक्षवेधी, आरोप प्रत्यारोपांना सुरुवात


बी. जी. शेख




औसा: नगर पालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली असून, सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींनी ताकदीचे उमेदवार मैदानात उतरविले आहेत. त्यात महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी लढत होईल असे वाटत असताना महायुतीतच संघर्ष पेटला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट अशी तिरंगी लढत होणार आहे. नगरपरिषदेची ही निवडणूक आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रतिष्ठेची, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या अस्तित्वाची मानली जात असली तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष किती ताकद लावतील यावर या निवडणुकीची रंगत वाढत जाणार आहे.



आमदार अभिमन्यू पवार यांच्या अस्तित्वाची तर भाजपासाठी प्रतिष्ठेची लढाई आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली औसा नगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण भाजपवासी झाले आहेत. भाजपच्या निष्ठावंताना या निवडणुकीत डावलले आहे. परंतु, ह्या निवडणुकीत भाजपचे



व मातब्बर राहिलेल्या नेतेमंडळींना डावलल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली की काय? असे वाटत आहे. भारतीय जनता पक्षाने मागील टर्मच्या नगरसेवकांना दिग्गजांना चक्क या निवडणुकीत डावलल्याने घरी बसवले आहे की काय ? असा संभ्रम निर्माण झाला आहे. अजित पवार गटाच्या वतीने डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. नगर परिषदेची निवडणूक महायुतीच्या संघर्षामध्येच रंगणार आहे. डॉ. अफसर शेख यांना चक्रव्यूहात अडविण्यासाठी डावपेच आखले आहेत. मात्र ते हा चक्रव्यूह भेदतात की त्यात अडकतात, हे येणारा काळच सांगणार आहे. आ. पवार यांच्यासाठी ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत औशातील जनतेने महाविकास आघाडीला मताधिक्य दिले होते.


शहरात विकासकामांच्या बळावर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात


महायुतीच्या दोन्ही पक्ष भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने जातीय समीकरणे साधत ताकदीचे उमेदवार मैदानात उतरविले


आहेत. मागील निवडणुकीत मतदारांचा त्या-त्या वॉर्डात मिळालेला कौल पाहता उमेदवारी देताना तशी समीकरणे जुळविण्यात आली नाहीत. आता या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. औसा नगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळविण्याच्या उद्देशाने भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकले आहेत. पालिका निवडणूक आपणच जिंकू असा दावा दोन्ही पक्षाकडून केला जात आहे. त्यामुळे या दोन पक्षात टक्कर होणार आहे. मतदारांना आपल्याकडे वळविण्यात कोणता पक्ष यशस्वी होणार यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत.


राजकीय डावपेच, जातीय समिकरणावर भर



नगरपालिकेच्या निवडणुकीतून डावपेच आखण्यात आले आहेत. याप्रमाणे कोण, कधी, कसा प्लस होईल, याची आकडेमोड केली जात आहे. जातीय समीकरणे साधत अनेक प्रभागांत उमेदवार देण्यात आले आहेत. त्या उमेदवारांचा जनसंपर्क, केलेली विकासकामे या बाजू लक्षात घेण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक प्रभागात चुरशीच्या लढती होणार


महाविकास आघाडी भारी पडेल?



मागील दहा ते १२ वर्षांपासून औसा नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता राहिली. गेल्या काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. त्यामुळे शरद पवारांना मानणारा मोठा गट व अजित पवारांना मानणारा गट वेगवेगळे झाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद यावेळी महाविकास आघाडी सोबत आहे. शिवाय काँग्रेसच्या ताकतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सोबत महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे यावेळी औशात आमदार अभिमन्यू पवार आणि डॉ. अफसर शेख यांना महाविकास आघाडी भारी पडली, तर त्यात नवल वाटणार नाही.

Post a Comment

0 Comments