बज्मे गालीब आयोजित आंतर शालेय नाट्य स्पर्धेतसात उर्दू नाटकाचा सहभाग २८ डिसेंबर सकाळी अकरा ते सहा वजेपर्यंत

 बज्मे गालीब आयोजित आंतर शालेय नाट्य स्पर्धेतसात उर्दू नाटकाचा सहभाग

२८ डिसेंबर सकाळी अकरा ते सहा वजेपर्यंत






सोलापूर - दरवर्षा प्रमाणे यंदा ही बज्मे गालीब या साहित्य सेवा संस्थेतर्फे १८ डिसेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये सात उर्दू नाटके सादर होणार सकाळी ११ ते सायं ६ वाजे पर्यंत सादर होणार असून लगेच ७ वाजता संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ उर्दू साहित्यिक बशीर परवाज यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी रंगभूमीच्या मीरां शेंडगे , संगीतकार प्रशांत देशपांडे , साहिर नदाफ यांच्या प्रमुख उपस्थित पारितोषिक वितरण होणार आहे

या आंतरशालेय उर्दू नाटय स्पर्धेत


सोशल घरकुल शाळे तर्फे श्रीपाद जोशी यांचा  व इरफान लालकोट दिग्दर्शित   "जिंदगी गुलजार थी " के बी एन उर्दू शाळेतर्फे मुजम्मिल शेख लिखित व दिग्दशित " चमक सिक्के की " तर शमा उर्दू प्राथमिक शाळेतर्फे डॉ . अ कदीर बिजापुरे लिखित व अबरार अहमद नल्लामंदू दिगदार्शित "कालीलिया का अंजाम " आणि सोशल उर्दू हायस्कूल तर्फे अदनान सरखोत मुंबई लिखित व वजाहत अब्दुल सत्तार दिग्दर्शित " होशियार . औन यू मार्क " तर फरखंदा हायस्कूल तर्फे एम मुबीन ठाणे लिखित व एम ए कलादगी दिग्दर्शत " कटा हाथ " तर एम ए पानगल हायस्कूल तर्फे धनंजय देशपांडे लिखित व डॉ हारून बागबान अनुवादित व आफ्रीन मुल्लां व नगमा मुजावर दिग्दर्शित  "जज़ीरा " आणि प्रोग्रेसिव्ह शाळेतर्फे अदनान सरखोत लिखित व एजाज शेख दिगदर्शित 'कूट - कूट " अश्या सात नाटके सादर होणार आहे

तरी या उर्दू नाटय रसिकांनी लहान बालकांचा कौतुक करिता वेळे वर उपस्थित रहावे असे आवाहन नाटय स्पर्धा संयोजक शफी कैप्टन व  युसूफ आलम सिद्दीकी यांनी केल आहे

Post a Comment

0 Comments