सहा जानेवारी दर्पण दिनानिमित्त *वैद्य , नल्लामंदू , मठपती , सोनवणे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे* *"आदर्श पत्रकार" पुरस्कार कुलकर्णी, पाटील, शेख, गोसावी यांना जाहिर*

 सहा जानेवारी दर्पण दिनानिमित्त 

*वैद्य , नल्लामंदू , मठपती , सोनवणे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे* 

*"आदर्श पत्रकार" पुरस्कार कुलकर्णी, पाटील, शेख, गोसावी  यांना जाहिर*





सोलापूर - हीरक महोत्सव साजरा  करणाऱ्या सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षाप्रमाणे यंदा ही ६ जानेवारी २०२६ रोजी पत्रकार दिनानिमित्त संचारकार स्व. रंगा अण्णा वैद्य यांच्या स्मरणार्थ  दै . सुराज्यचे ज्येष्ठ पत्रकार पुरोषत्तम कुलकर्णी, कासिदकार स्व. अ. लतीफ नल्लामंदू  यांचे नावे असलेला पुरस्कार दै . लोकमतचे उपसंपादक अप्पासाहेब दिलीप पाटील, बार्शीचे ज्येष्ठ पत्रकार स्व. बाबुराव मठपती यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र टाईम्सचे ऑनलाईन प्रतिनिधी इरफान महिबूब शेख यांना तर ग्रामीण भागातील पत्रकार दै . संचारचे प्रतिनिधी प्रमोद हरिभाऊ गोसावी यांना ज्येष्ठ पत्रकार कै. मारुती सोनवणे यांच्या स्मरणार्थ

दिला जाणारे " आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात  आल्याची  माहिती पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अय्यूब अहमद नल्लामंदू व सचिव प्रा पी पी कुलकर्णी यांनी दिली आहे.

या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख, सन्मान पत्र , शाल बुके असे आहे. "आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६"चे वितरण  विजापूर रोड सोलापूर येथील पत्रकार भवन "कै रंग्गा अण्णा  वैद्य सभागृह"मध्ये ६ जानेवारी दुपारी  १ वाजता हा कार्यक्रम संघाचे अध्यक्ष अशोक मठपती  यांच्या अध्यक्षतेखाली व मध्य सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे  यांच्या शुभ हस्ते व उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वानी वेळेवर उपस्थि रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष अय्युब अहमद नल्लामंदू व सचिव प्रा. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments