इकबाल शेख यांना 'पत्रकारितेचा सुर्य' पुरस्काराने सन्मानित
बी जी शेख
औसा . येथील साहित्यिक, स्तंभलेखक, कवी, पत्रकार तसेच विधिज्ञ अॅड. इकबाल रसूलसाब शेख यांना नांदेड येथील खादमीन-ए-उम्मत या स्वयंसेवी संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेला 'आफताब-ए-सहाफत' (पत्रकारितेचा सूर्य) विभागीय पत्रकारिता पुरस्कार १८ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे एका विशेष समारंभात एम आय एम चे राज्य कार्याध्यक्ष सय्यद मुईन आणि मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
इकबाल रसूलसाब शेख यांच्या कविता व लेखनाचे मराठी व हिंदी वृत्तपत्रांतून नियमित प्रकाशन होत असते.ते सा.लातूर रिपोर्टरचे कार्यकारी
संपादक व स्तंभलेखक असून प्रश्नचिन्ह व आँखों देखा हाल या नावाने प्रसिद्ध होणारे त्यांचे स्तंभलेख वाचकप्रिय ठरले आहेत. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ते मराठी व हिंदी पत्रकारितेत सक्रिय असून, सध्या ते विविध वर्तमानपत्रांमध्ये लेखन करीत आहेत.
पत्रकारितेसोबतच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असून, गेल्या २५ वर्षांपासून खिदमत-ए-खल्क सोशल वेल्फेअर सोसायटी च्या माध्यमातून सामाजिक कार्यात सतत कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान असून, ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल व राहत अकॅडमीच्या माध्यमातून दजेर्दार शिक्षण देण्याचे कार्य ते करीत आहेत.
अनेक क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत खादमीन-ए-उम्मत संस्थेने त्यांची या विभागीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. 'आफताब-ए-सहाफत
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतून इकबाल रसूलसाब शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, खादमीन-ए-उम्मत संस्थेचे अध्यक्ष आबेद खान हमीद खान यांच्या वतीने पुरस्कार निवडीचे पत्र अलहाज सलीम अलंद सर व अलहाज सय्यद म. सलीमोद्दीन सर ज्येष्ठ पत्रकार म मुस्लिम कबीर, संपादक मजहर पटेल, आणि पत्रकार मित्रांनी इकबाल रसूलसाब शेख यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Comments