लातूरच्या काझी सुलताना बेगम मिनहाजोद्दीन यांना ‘सर सय्यद अहमद खान पुरस्कार’ प्रदान

 *लातूरच्या काझी सुलताना बेगम मिनहाजोद्दीन यांना ‘सर सय्यद अहमद खान पुरस्कार’ प्रदान*




लातूर (ॲड.इकबाल शेख)  लातूर येथील ज्येष्ठ समाजसेविका व शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काझी सुलताना बेगम मिनहाजोद्दीन यांना त्यांच्या दीर्घकालीन, निस्वार्थ व प्रभावी शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठित ‘सर सय्यद अहमद खान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.हा सन्मान नांदेड येथील खादमीन-ए-उम्मत या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने एका गौरवपूर्ण समारंभात देण्यात आला.

     काझी सुलताना बेगम मिनहाजोद्दीन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी केलेले अथक प्रयत्न,शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राबवलेले उपक्रम तसेच नैतिक मूल्यांची जोपासना करणारे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे.शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता संस्कार,चारित्र्य आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे असावे,हा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येतो.



     पुरस्कार स्वीकारताना सुलताना बेगम यांनी सर्वांचे आभार मानत शिक्षण आणि संस्कार हीच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. महिलांचे व मुलींचे शिक्षण मजबूत झाले,तर संपूर्ण समाज सशक्त होईल,असे मत व्यक्त केले.त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.खादमीन-ए-उम्मत संस्थेचे अध्यक्ष आबेद खान हमीद खान सर तसेच डॉ.म.इकबाल संस्थेचे सचिव म.अशरफ खान सर,उपाध्यक्ष काझी युनूस सलीम,काझी नसरीन बाजी,अलहाज सलीम अलंद सर व अलहाज सय्यद म.सलीमोद्दीन करीमोद्दीन सर व संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी काझी सुलताना बेगम मिनहाजोद्दीन यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची केवळ दखल नसून शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी सन्मान ठरत आहे.

Post a Comment

0 Comments