महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाला आजपासून (११ एप्रिल) सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने विशेष लेख

 धन्य धन्य महात्मा फुले➡️

📕महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाला आजपासून (११ एप्रिल) सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने विशेष लेख

◆◆◆◆◆●●●●●●●



जोतिराव फुले ह्यांचा जन्ग ११ एप्रिल १८२७रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण गावातः शेतकरी फुटुंबात झाला. शिक्षणानिमित्ताने ते पुण्यात आले. तरुण वयात त्यांनी लेखक थॉमस पेन यांनी लिहिलेलं राईटस् ऑफ मॅन हे पुस्तक वाचले, थॉमस पैन यांचा हा ग्रंथ युरोप आणि अमेरिकेतही अत्यंत विचारप्रवर्तक तरला होता. त्यातील स्वातंत्र्य व समतेचो विचार आणि लोकशाहीचा आग्रह जोतिरावांना भावला. यामुळेच त्यांना वर्णव्यवस्थेने जातीनिशी ठरवलेल्या शूद्र अतिशुद्रांच्या गुलामगिरीची जाणीव झालीः आणि त्यांनी समाज परिवर्तनासाठी धर्मचिकित्सा आणि जालीभेदावर टीका करण्यास सुरुवात केली. ते कर्ते समाज सुधारक असल्याने त्यांनी आपल्या वयाच्या २१ व्या वर्षी पुण्यात देशातील मुलींची पहिली शाळा (१८४८) सुरू केली आणि भारतातील सार्वत्रिक स्त्री

स्वातंत्र्याचा पाया रचला.


धर्म व्यवस्थेने आपल्या स्वार्थासाठी अस्पृश्य ठेवलेला समाज, महिला, शेतकरी, कामगार यांच्या शिक्षणावर विशेष भर दिल्याचे 'फुलेपर्च साक्ष देतं. जोपर्यंत हे चार समाज घटक शिक्षित होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार नाही आणि सामाजिक विषमता नष्ट होणार नाहीं, हे जोतिराव फुले याना पक्के ठाऊक होते. म्हणून त्यांनी ह्या चारही घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञाननिष्ठा रुजविण्याचे आणि वाढवण्याचे कार्यही सुरू केले. त्यासाठी कष्टकऱ्यांसाठी १८५५ मध्ये रात्र शाळा सुरू केली. अस्पृश्य ठरवलेल्यांसाठी आपल्या घरापुढील मालकीचा हौद पिण्याच्या पाण्यासाठी खुला केला. देव, दैव आणि धर्मग्रंथ हाांच्या माध्यमातून ब्राह्मणेतरांच्या जीवनाला 'भटीपाश कसा आवळला जातो, ते त्यानी 'ब्राह्मणाचे कसब' (१८६९) आणि 'गुलामगिरी' (१८७३) ह्या ग्रंथांतून उघडं केलंय.

Post a Comment

0 Comments