शाळेच्या बाला उपक्रमासाठी दरवर्षी 25 लाख निधी देऊ ------आ.अभिमन्यू पवार
औसा (प्रतिनिधी)२२
जिल्हा परिषदेच्या शाळा लातूर जिल्ह्यात आता नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असून शैक्षणिक दर्जा व पटसंख्या सुधारणा होत आहे. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी आता जिल्हा परिषदेच्या शाळेत ओळत असून शिक्षकांच्या चांगल्या कार्यामुळे त्यांना पुन्हा समाजात आदराचे स्थान मिळत आहे. शाळेच्या बाला उपक्रमातून बोलक्या भिंती तयार करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, राबवत आहेत. या उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग निश्चित मिळेल. दर वर्षी आमदार या नात्याने 25 लाख रुपयांचा निधी आगामी तीन वर्ष बाला उपक्रमासाठी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन अभिमन्यू पवार यांनी दिले. उत्का ता औसा येथे आयोजित मुख्याध्यापकांची तालुकास्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, जि प सदस्य महेश पाटील, प. स. सदस्य दीपक चाबुकस्वार, युवा नेते संतोष मुक्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अनुपमा भंडारी, सरपंच डॉ. स्वाती महावरकर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना आ.पवार म्हणाले की, शिक्षक सुद्धा शेतकरीच असून बहुतांश शेतकऱ्यांची मुले ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेतात. ग्रामीण विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देऊन देशाचे चांगले नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षक करतो. बाला उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांची ओळख करून देऊन शेतीशी संबंधित विषय सुद्धा शिकविले तर येणाऱ्या काळात शेतकरी समृद्ध होऊ शकेल. या वेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना राहुल केंद्रे म्हणाले की लातूर जिल्ह्याची शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोरोना च्या संकटामुळे आम्हाला बरीच कामे करता आली नाहीत. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून शाळेच्या वर्गखोल्या, शौचालय, संरक्षक भिंती, अशा अनेक कामासाठी निधीची कमतरता भासत असली तरी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक पदे रिक्त असल्याने अडचणी येत आहेत. उतका ता. औसा येथे भर पावसात आयोजित मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत अनेक गावातील मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेच्या अडचणी सांगितल्या. सर्वांच्या अडचणीची नोंद घेऊन लवकरच शिक्षकांना शाळे संदर्भात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदारांनी यावेळी केल्या. प्रारंभी शाळा परिसरात वृक्ष लागवडीचा समारोप आ. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संयोजक महादेव खिचडे यांनी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्याचा उद्देश व जि प प्रा शा उतका येथील परिसरातील बाला उपक्रमातून केलेल्या कामाची माहिती विषद केली. यावेळी महेश पाटील, अभिनव गोयल यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन कमलाकर सावंत यांनी केले. कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाची शक्यता गृहीत धरून संयोजकांनी वाटरप्रूफ मंडप टाकल्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे उपस्थितांची गैरसोय टळली,




0 Comments