आझाद महाविद्यालयातील सात दिवसीय योगा शिबिराची सांगता
औसा_ येथील आझाद महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि भौतिकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ सप्टेंबर ते २१सप्टेंबर या कालावधीत सात दिवसीय ऑनलाईन योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याची यशस्वी सांगता झाली. या योग शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून पतंजली योगपीठ हरिद्वारचे अधिकृत प्रशिक्षक प्रा डॉ. ब्रिजमोहन दायमा व प्रा डॉ. सारिका दायमा हे लाभले होते. प्रथमतःयोग प्रशिक्षण शिबिराचे उद् घाटन मुख्य संयोजक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ई.यू.मासुमदार यांच्या हस्ते झाले. या योग शिबिरात नित्यनियमाने दररोज सकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत प्राणायाम, अनुलोम विलोम यासारखे योगातील अनेक प्रकारांचे प्रशिक्षण उपस्थितांना देण्यात आले.
या शिबिराच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.ई.यु.मासुमदार यांनी योगा हा मानवाच्या सर्वांगीण आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून सध्याच्या कोरोना काळात प्रत्येकाने योगासने व प्राणायाम करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. शिबिराचे सूत्रसंचालन प्रा डॉ.बी.डी.इंगळे,प्रा डॉ.एम.एम इनामदार यांनी केले. या सात दिवसीय योगा प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य तन्वीर जहागीरदार, प्रा डॉ.आदित्य माने,प्रा डॉ.मेहराज बरोटे,प्रा डॉ.दिलीप क्षीरसागर, प्रा.मजहर कोतवाल,प्रा डॉ. निसार सय्यद, प्रा.वैजनाथ जावळे, यांनी परिश्रम घेतले.या ऑनलाईन योग शिबिरासाठी दररोज १०० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती होती.

0 Comments