औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 जिल्ह्यात चाळीस केंद्रांवर होणार मतदान

 


 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023

जिल्ह्यात चाळीस केंद्रांवर होणार मतदान

लातूरदि. 28 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार सोमवार, 30 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होत आहे. जिल्ह्यात 40 मतदान केंद्रांवर 11 हजार 296 शिक्षक मतदार आपला हक्क बजावतील.

जिल्ह्यातील मतदान केंद्रांचा क्रमांक व नाव पुढीलप्रमाणे आहे (कंसात एकूण मतदार संख्या)-

124- तहसील कार्यालय, व्ही. सी. रूम, मेन रोड, लातूर (1001)

125- पंचायत समिती, तळ मजला, तहसील कार्यालयाजवळ, लातूर (990)

126- उपविभागीय अधिकारी कार्यालय, कोर्ट हॉल जिल्हा न्यायालयासमोर, लातूर (999)

127- सार्वजनिक वाचनालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, लातूर (936)

128- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, उत्तर बाजू, कासारखेडा (84)

129- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, उजवी बाजू गातेगाव (154)

130- जिल्हा परिषद प्रशाला, नवीन इमारत, तांदूळजा (124)

131- पंचायतराज प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षण हॉल, मुरुड (बुद्रुक) (218)

132- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मध्य बाजू, बाभळगाव (128)

133- बैठक हॉल, तहसील कार्यालय, औसा (468)

134- ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य इमारत, लामजना, ता. औसा (188)

135- ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य इमारत, बेलकुंड, ता. औसा (178)

136- ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य इमारत, भादा, ता. औसा (68)

137- ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य इमारत, किनीथोट, ता. औसा (112)

138- तहसील कार्यालय, व्ही. सी. रूम, रेणापूर (159)

139- जनता विद्यालय, पश्चिम बाजू, पोहरेगाव (96)

140- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वर्ग तिसरा, पानगाव (169)

141- शिवाजी विद्यालय, पूर्व बाजू, उदगीर (867)

142- शिवाजी विद्यालय, उत्तर बाजू, उदगीर (249)

143- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र. 01, पश्चिम बाजू, हेरखोली (145)

144- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली क्र. 03, उत्तर बाजू, देवर्जन (78)

145- ग्रामपंचायत कार्यालय, वाढवणा बु. (94)

146- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जळकोट (208)

147- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोणसी (196)

148- पंचायत समिती, सामान्य प्रशासन विभाग, अहमदपूर (577)

149- समाजमंदिर, तलाठी कार्यालयाजवळ, किनगाव (241)

150- जिल्हा परिषद प्रशाला, वर्ग आठवा, खंडाळी (98)

151- ग्रामपंचायत कार्यालय, बैठक कक्ष, शिरूर ताजबंद (299)

152- जिल्हा परिषद मुलांची माध्यमिक शाळा, दक्षिण दिशा, वर्ग चौथा, चाकूर (280)

153- जिल्हा परिषद मुलींची शाळा, पश्चिम बाजू, खोली क्र. 3, वडवळ नागनाथ (137)

154- जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, पूर्व बाजू, सभागृह, नळेगाव (182)

155- तहसील कार्यालय, निलंगा, मध्य बाजू, कॉन्फरन्स हॉल, ता. निलंगा (373)

156- जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, पश्चिम बाजू, कासारसिरसी, ता. निलंगा (121)

157- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पूर्व बाजू, मदनसुरी, ता. निलंगा (58)

158- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डावी बाजू, औराद शहाजानी, ता. निलंगा (243)

159- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पूर्व बाजू, पानचिंचोली, ता. निलंगा (133)

160- जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा, पश्चिम बाजू, वर्ग 3 अ, शिरूर अनंतपाळ (169)

161- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, नवीन इमारत, हिसामाबाद (125)

162- सभागृह, दक्षिण बाजू, तहसील कार्यालय, देवणी (240)

163- सभागृह, पश्चिम बाजू, ग्रामपंचायत कार्यालय, वलांडी (111)

*****





औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023

लातूर जिल्ह्यात सोमवारी मद्यविक्री राहणार बंद

लातूर, दि. 28 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार सोमवार, 30 जानेवारी रोजी मतदान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 28 जानेवारी रोजी दुपारी चारपासून ते 29 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या आदेशांमध्ये बदल करून आता 30 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या 30 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये कडक कार्यवाही करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

*****

Post a Comment

0 Comments