न्यायालयीन कामकाजात उर्दू भाषेचा सहभाग उल्लेखनीय : ॲड. रजपूत

 न्यायालयीन कामकाजात उर्दू भाषेचा सहभाग उल्लेखनीय : ॲड. रजपूत








सोलापूर- 'न्यायालयीन कामकाजात उर्दू भाषेनी जो प्रभाव सोडला आहे तो प्रशंसनीय आहे. मोठ्या प्रमाणावर उर्दूचे शब्द समाविष्ट झाले आहेत की ते आता अपरिहार्य झाले आहेत.  या शब्दांची गोडी इतकी जास्त आहे की, कोणी आता त्यांना बदलूही शकत नाही', असे उद्गार प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह रजपूत यांनी काढले.  सोलापूर बार असोसिएशन व खादिमाने उर्दू फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने अशर-ए-उर्दू २०२३ अंतर्गत आयोजित परिसंवाद 'अदालती कारवाई में उर्दू का रोल' या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. आसिम बांगी होते.

प्रास्ताविकात फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी उर्दूच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली आणि उर्दूबद्दल सांगितले की, 'जहाँ जाईएगा हमें पाईएगा' अशी प्रस्थिती आहे. फिल्म व सिरीयलचे संवाद असो दे, गज़ल व गीत असो दे किंवा संसदेत बजटपेश असू दे उर्दू तेथे उपस्थित असते.

परिसंवादाचे मुख्य वक्ते ॲड. ए.जी. कुलकर्णी उपस्थित नसल्यामुळे त्यांचा लेख वरिष्ठ ॲड. अ. रशीद जानवाडकर यांनी प्रस्तुत केला. 'उर्दू का अदालती लहजा' या विषयावर आपले मनोगत व्यक्त् करताना सांगितले की, उर्दू भाषा १२वी शताब्दीमध्ये विकसीत झाली व अरबी, फारसी, संस्कृत, तुर्की, बृज यांचे शब्द या भाषेत समाविष्ट करण्यात आले. ही भाषा फक्त मुसलमानाची भाषा नसून सर्व भारतीयांची भाषा आहे. उर्दू साहित्यिक डिप्टी नज़ीर अहमद यांनी ही शब्दावली न्यायालयीन कामकाजासाठी दिली. १८६० मध्ये इंडियन पीनल कोडचा उर्दू भाषांतर झाला व 'ताजिरात-ए-हिंद', 'मुवक्कील', 'दफा ३०२' कैदे बामशक्कल सारखे शब्द अत्यंत लोकप्रिय झाले. सुप्रसिध्द उर्दू कवी मिर्जा गालिब यांनी पेन्शनसाठी व अन्य कामासाठी २० वर्ष न्यायालयाच्या पायऱ्यावर काढले. त्यांच्या शायरीत सुध्दा अनेक न्यायालयीन शब्द दिसतात. 'वकालत नामा', 'रोजनामा', 'शिरस्तेदार', 'नाजीर' असे अनेक शब्द न्यायालयात दररोज बोलले जातात.  'हलफनामा', 'खुर्द', 'बुद्रुक', 'रहेन', 'मुलज़ीम', 'मुजरिम', 'तर्मीम', 'दस्तावेज' आदी शब्द अत्यंत लोकप्रिय असून त्यांचा मोठा प्रभाव न्यायालयीन कामकाज आहे. 

ॲड. करण भोसले, सचिव बार असोसिएशन यांनी स्वागत केले. अध्यक्षस्थनावरून बोलताना सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. आसिम बांगीनी सांगितले की, आमच्या कामाशी निगडीत विषयावर आजचा परिसवांद झाला. उर्दू माझी मातृभाषा आहे पण माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहेत. मी सुध्दा आता उर्दूचा सखोल अभ्यास करीन.

याप्रसंगी अनेक वकील साहबानी उर्दू भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली व उर्दू वर्ग दररोज संध्याकाळी बार असोसिएशनमध्ये सुरू करण्याची विनंती केली. अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी घोषित केले की लवकरच उर्दूचे वर्ग तेथे सुरू करण्यात येईल. अधिकांश उपस्थिताने न्यायालयीन कामकाजासाठी उर्दूची शब्दावली तयार करण्यासंबंधी विनंती केली. त्यावर फोरमचे खजिनदार नासिरोद्दीन आळंदकर यांनी एक महिन्यात फोरमतर्फे ही शब्दावली प्रकाशित करून प्रत्येक वकीलाला देण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी ॲड. जुलेखा पीरजादे व खतीब वकील यांनी आपले मनोगत व्यक्त् केले. सूत्रसंचालन नासिरोद्दीन आळंदकर यांनी केले. ॲड. अनिता रणशृंगारे यांनी आभार मानले. याप्रसंगी सचिव अ. मन्नान शेख, समन्वयक रफीक शेख सहीत सुमारे २०० वकील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments