प्राचार्य श्री पी.सी.पाटीलसर यांचा सेवापूर्ती सत्कार संपन्न.
आलमला :- दि. 29 डिसेंबर 2025 रोजी श्री रामनाथ मा. व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथील प्राचार्य श्री पी.सी.पाटील हे आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले, त्यामुळे शाळेमध्ये त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रामनाथ शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक प्रा. जी.एम. धाराशिवे यांच्या शुभहस्ते हा सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष ऍड उमाशंकर पाटील हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून आलमला केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भागवतजी जगताप साहेब विस्तार अधिकारी श्री हमीद शेख उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये वि.का सोसायटीचे चेअरमन श्री विश्वनाथ बिराजदार श्री सुरेंद्रजी पो.पाटील, विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री प्रशांत धाराशिवे, सरपंच श्री विकास वाघमारे, हे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली,त्यानंतर पाचवीच्या विद्यार्थीनींनी सुंदर स्वागत गीत सादर केले. त्यानंतर सर्वच मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सत्कारानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे सर यांनी मांडले, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. अंबिका खिचडे या विद्यार्थिनींनी आपले विचार मांडले तसेच माजी विद्यार्थी अण्णाराव वाघमारे यांनीही सरांबद्दलचे गौरव उद्गार मांडले, शिक्षक प्रतिनिधी म्हणून विद्यालयातील सहशिक्षक डॉ. शरण धाराशिवे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या व त्या नंतर सत्कारमूर्ती व त्यांच्या पत्नी सेवानिवृत्त प्राचार्या सौअनिता पाटील मॅडम यांचा संस्थेच्या व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने भर पेहराव आहेर,शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तीचे चिरंजीव इंजि.अनिकेत पाटील यांनीही आपल्या वडिलांप्रती भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी श्री भागवत जगताप साहेब यांनीही पी.सी.पाटील सरांच्या कार्यावर प्रकाश टाकून त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ऍड उमाशंकर पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला. याप्रसंगी रामनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव अंबुलगे, कोषाध्यक्ष
चनबसप्पा निलंगेकर, संचालक मन्मथप्पा धाराशिवे,
विरनाथ हुरदळे, शिवसांब हुरदळे, पंचक्रोशीतील ग्रामस्थ,महिला भगिनी, विद्यार्थी पालक, माजी विद्यार्थी, पाटील परिवारातील सदस्य,नातलग मित्रपरिवार आणि आलमला घटक शाळेतील शिक्षक विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. मुळे पी.के. यांनी मांडले.

0 Comments