औसा ते आलमला कडे जाणारा रस्ता मृत्यूचा सापळा; प्रशासनाचा गंभीर दुर्लक्ष

 औसा ते आलमला कडे जाणारा रस्ता मृत्यूचा सापळा; प्रशासनाचा गंभीर दुर्लक्ष




औसा तालुक्यातील आलमला गावा कडे जाणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून हा रस्ता जणू काही मृत्यूचा सापळा बनला आहे. मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि विशेष करून पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी आणि दररोज च्या चालणाऱ्या मोठ्या मालवाहतूक गाड्या, कॉलेज बसेस यामुळे दररोज अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे आणि छोटे छोटे अपघात होतही आहेत. तरीही संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आलमला व औसा च्या नागरिकांकडून, विद्यार्थी व पालकांकडून केला जात आहे.



दररोज मजुरकाम करणारे व नोकरदार नागरिक, औसा तसेच आलमला येथील शिक्षण संकुलात शिकणारे शेकडो विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी याच रस्त्याने ये-जा करतात. अनेक वेळा दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडल्या असून वाहनांचे नुकसानही होत आहे. तसेच दैनंदिन वाहतुकी नुसार बघितले गेले तर हा रस्ता छोटा पडत आहे.



विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असताना प्रशासन मात्र केवळ आश्वासनांवर वेळकाढूपणा करत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासना  कडून गरज नसताना उंबडगा गावाचा रस्ता हा परत परत बांधला जात आहे व आलमला रस्ता जास्त वाहतुकीचा असून ही याच्या कडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ही चित्र समोर आले आहे



स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. 

एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


जर तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही मोठे अपघात होण्याची भीती विद्यार्थी ,पालक व नागरिकांना वाटत आहे.

Post a Comment

0 Comments