श्री गोरखनाथ कसबे यांच्या संकल्पनेतून“जुन्या आठवणींना उजाळा, गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि मैत्रीचा स्नेहबंध – समदर्गा शाळेतील 2007 च्या बॅचचा अविस्मरणीय स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.”
आज जिल्हा परिषद शाळा समदर्गा येथे इ.स. 2007 मध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा व माजी शिक्षकांचा स्नेहमेळावा अत्यंत आनंदात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्याचे आयोजन माजी विद्यार्थी श्री गोरखनाथ कसबे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी तसेच विद्यमान शिक्षिका शिवनंदा स्वामी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोकळेपणाने आपली मनोगते व्यक्त केली.
या स्नेहमेळाव्यात इ.स. 2007 मधील सर्व गुरुजन तसेच सध्या कार्यरत असलेले शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व शिक्षकांचा इयत्ता सातवीच्या बॅचच्या वतीने ट्रॉफी, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमास आदरणीय इनामदार सर, भोसले सर, जाधव सर, मुरमे सर, देशमाने सर, जंगाले सर, मुळे सर, सोनटक्के सर तसेच जिल्हा परिषद शाळा समदर्गा चे मुख्याध्यापक शेख सर, गोसावी सर, पल्लेवाड सर, मेढे सर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अंगणवाडी शिक्षिका सौ. कुसुमनानी,चेंडके ताई व कालींदा ताई यांचीही उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांमध्ये श्री गोरखनाथ कसबे, श्री सतीश गरगडे, श्री गोरख चेंडके, श्री सदाशिव गिराम, श्री प्रकाश सांगवे, श्री गोपाळ तिडके आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी शिक्षक स्वर्गीय गायकवाड सर व सय्यद सर तसेच बॅचमधील ज्या मित्रांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आनंदही घेतला, त्यामुळे स्नेहमेळाव्याचे वातावरण अधिक आपुलकीचे व संस्मरणीय बनले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कसबे गोरख यांनी केले. या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून गुरु-शिष्य नात्याचा स्नेहबंध अधिक दृढ झाला

0 Comments